ठाणे ग्रामीण पोलिस सेवेस असलेल्या शितल खरटमल यांना भारत श्री हा राष्ट्रीय पुरस्कार

ठाणे ग्रामीण पोलिसांत सेवेस असलेल्या शितल खरटमल यांना ग्रो ग्रीन फाऊंडेशन तर्फे भारत श्री या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मध्यप्रदेशमधील इंदोर येथे नुकत्याच पार पडलेल्या गौरव सोहळ्यात शितल यांना क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगिरी करता हा पुरस्कार देण्यात आला आहे. शितल खरटमल यांनी ज्यूडो, कराटे आदी सेल्फडिफेन्स क्रीडा प्रकारात नैपुण्य मिळवले असून त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये देशाला पदके मिळवून दिली आहेत. शितल यांनी तब्बल १८ वेळा आंतरराष्ट्रीय ज्यूडो मार्शल स्पर्धामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करताना ६७ सुवर्णपदके जिंकली आहेत. त्यात २०२२ मध्ये युरोपमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि एका कांस्यपदकाचा समावेश आहे. शितल यांना २०२० मध्ये पंजाब सरकारने अर्जुन पुरस्कार देऊन गौरवले होते. याशिवाय २०२१ मध्ये भारत भूषण पुरस्कारासह विविध ३७ पुरस्कार शितल यांना मिळाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या स्वयंसिद्धा शिबिराच्या माध्यमातून सुमारे १२ हजार मुलींना स्वसंरक्षणासाठी धडे दिले आहेत

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading