पत्नीशी झालेल्या कौटुंबिक वादातून माथेफिरूचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

पत्नीशी झालेल्या कौटुंबिक वादातून विमनस्क बनलेल्या माथेफिरूनं स्वत:वरच वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काल दुपारी ठाणे रेल्वे स्थानकाजवळ हा प्रकार घडला. पत्नीशी बिनसल्यानं उस्मानाबाद येथे राहणारा भीमराव भिसे हा तरूण ५ दिवसांपूर्वी माजिवडा येथे राहणा-या आत्याकडे आला होता. काल सकाळी साडेअकराच्या सुमारास मासळी विक्रेत्याकडील कोयता लांबवून पळत असताना नागरिक चोर चोर असे ओरडल्यानं तो बिथरला. जमाव आपल्याला आता पकडून मारणार असं वाटल्यानं त्यानं कोयत्यानं स्वत:वर सपासप वार करण्यास सुरूवात केली. हा प्रकार जवळच असलेल्या वाहतूक पोलीसाच्या लक्षात येताच ठाणे नगर पोलीसांची कुमक त्यांनी मागवली. त्यानंतर त्याच्याकडील कोयता काढून घेतल्यानंतर देखील तो रस्त्यावर डोके आपटून घेण्याचा प्रयत्न करत असल्यानं पोलीसांनी बळाचा वापर करून त्याला जेरबंद केलं. डोक्यावर आणि छातीवर निसटते वार झाल्यानं तो रक्तबंबाळ झाला होता. त्याला सिव्हील रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा सर्व प्रकार अनेक प्रवाशांच्या मोबाईलमध्ये कैद झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading