चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं हिंदी भाषीय एकता परिषदेचं आवाहन

चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन हिंदी भाषीय एकता परिषदेनं केलं आहे. काश्मिरच्या मुद्यावर पाकिस्तानला पाठिंबा देणा-या चीनविरूध्द हिंदी भाषीय एकता परिषदेनं जोरदार आघाडी उघडली आहे. संस्थेचे अध्यक्ष बी. एल. शर्मा यांनी सर्व राष्ट्रवाद्यांना चिनी उत्पादनांवर पूर्णपणे आर्थिक बंदी घालण्याचं आवाहन केलं आहे. काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यानंतर पाकिस्ताननं हे प्रकरण संयुक्त राष्ट्राकडे नेलं असताना चीनने त्याला पाठिंबा देऊन भारताबद्दल त्याच्या मनात किती उद्रेक आहे हे दाखवून दिलं आहे. एकीकडे भारत हा चीनी उत्पादनांसाठी प्रचंड बाजारपेठ असताना दुसरीकडे तो पाकिस्तानशी हात मिळवून आहे. चीनला धडा शिकवण्यासाठी त्याच्या आर्थिक नाड्या तोडल्या पाहिजेत असं सांगत भारतवासियांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालावा असं आवाहन शर्मा यांनी केलं आहे. यापूर्वीही चीनने असे प्रकार केले आहेत. सध्या चीन आपल्या काही उत्पादनांवर थेट मेड इन चायना असं न लिहिता पीआरसी असे लिहून विकत आहे. हा लोकांना भ्रमित करण्याचा नवीन मार्ग असून अशा चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन बी. एल. शर्मा यांनी केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading