शासनाच्या लोकसाहित्य समितीचे पुर्नगठन

मराठी प्रदेशातील लोककला, साहित्य संदर्भात सल्ला देणे, लोकसाहित्य प्रकाशित करणे आदी कामांसाठी शासनाच्या वतीने लोकसाहित्य समितीचे पुनर्गठन करण्यात आले असून ठाण्यातून डॉ. प्रकाश खांडगे, प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे आणि मोनिका ठक्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर संभाजीनगरमधून भारुडरत्न निरंजन भाकरे यांचे चिरंजीव शेखर भाकरे यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. मराठी प्रदेशातील लोकसाहित्याचे संशोधन करणे, या संदर्भात सल्ला देणे आणि असे लोकसाहित्य प्रकाशित करण्यासाठी शासनाकडे प्रस्तावित करण्याकरिता या समितीची पुनर्रचना करून लोकसाहित्य समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीचा कालावधी डिसेंबर 2018 रोजी संपुष्टात आल्यानंतर या समितीचे पुर्नगठन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार लोकसाहित्य समिती पुनर्गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये शाहीर हेमंत मावळे(पुणे), मोनिका ठक्कर(ठाणे), प्रा. डॉ. प्रकाश खांडगे (ठाणे), प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे(ठाणे), शेखर निरंजन भाकरे(संभाजीनगर), मार्तंड कुलकर्णी(पुणे), प्रणव पाटील(पुणे), संगीता बर्वे(पुणे), भावार्थ देखणे(पुणे) आदींचा समावेश आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading