पक्षाने संधी दिली तर ठाण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची संजय केळकरांची इच्छा

पक्षाने संधी दिली तर ठाण्याची जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी यासाठी आम्ही आग्रही असून पक्षाने संधी दिली तर आपण ही जागा स्वतः आनंदाने लढायला तयार आहोत असा दावा संजय केळकर यांनी केला. पागडीचं कार्यालय आम्ही पाहिले आहे आता स्वतःचे कार्यालय झाले. पक्ष देखील कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मोठा झाला त्याचा आनंद आहे अन्यायाच्या विरुद्ध लढणाऱ्या प्रत्येकाला या जागेत येऊन नक्कीच आवाज उठवता येईल. – प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज कार्यालय हवे ही संकल्पना पक्षाची आहे संख्या वाढल्यानंतर कार्यालयाची उपलब्धता वाढवणे गरजेचे होते महायुतीच्या या कार्यालयात बैठका होतील असे युतीतील काही नेत्यांनी सांगितले. त्यात काही गैर नाही निवडणुकीच्या काळात महायुतीच्या बैठका या कार्यालयात होतील. या कार्यालयात युतीचा छोटा मेळावा घेता येईल. त्यामुळे आम्हाला वावग वाटत नाही. अद्यापही ठाण्याची जागा कोणाकडे आहे ते जाहीर झाले नाही. आम्ही भाजपला ही जागा मिळावी यासाठी आग्रही आहोत पक्षाने संधी दिली तर स्वतः आनंदाने लढायला तयार आहे. कार्यकर्ते मला नक्कीच मदत करतील. – 25 वर्षापूर्वीची गोष्ट वेगळी होती. रामभाऊ कापसे खासदार होते. त्यावेळी दिघे यांनी नगरसेवक अधिक असल्याचे गणित मांडले. त्यावेळी शिवसेनेला ही उमेदवारी देण्यात आली. आणि प्रकाश परांजपे तीनदा खासदार झाले. आता आमचे आमदार देखील अधिक आहेत. नगरसेवक आहेत, जर ही जागा मिळाली तर कार्यकर्ता सुखावेल. शेवटी कोण कोणत्या चिन्हावर उभ राहू हे सांगणारा मी अधिकारी नाही. शिवसेना विभक्त झाल्यानंतर जागा बदलल्या. ठाण्यात देखील जे खासदार होते ते उद्धव ठाकरे गटात आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणचे गणित बदलले आहे. मोदींचे हात बळकट करायचे हा एकच उद्देश आहे त्यादृष्टीने कामाला लागायचे आहे असं संजय केळकर यांनी सांगितलं.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading