जिल्हा शासकीय रूग्णालयात गेल्या दहा महिन्यात विविध प्रकारच्या ३०४० शस्त्रक्रिया

खाजगी रुग्णालयात न परवडणाऱ्या जोखमीच्या शस्रक्रिया आणि औषधोपचार सिव्हिल रुग्णालयामध्ये मोफत होत असून गेल्या दहा महिन्यात विविध प्रकारच्या ३०४० शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक शस्त्रक्रिया गरोदर माता आणि महिलांच्या विविध समस्यांच्या असून, त्या खालोखाल डोळे, दंत अस्थीरोग, कान, नाक, इत्यादी शस्त्रक्रियांचा समावेश आहे. वागळे इस्टेट येथील स्थलांतरित तात्पुरत्या सिव्हील रुग्णालयात उपचार करताना, रुग्णांची आबाळ होणार नाही याची दक्षता आरोग्य प्रशासनाने घेतली आहे. रुग्णालयात दर दिवशी सुमारे ५०० ते ६०० रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. काहीवेळा या रूग्णांवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात. एका महिन्याला सरासरी ३०० ते ३२५ शास्त्रिक्रिया होत आहेत. जून ते मार्च २०२४ या दहा महिन्यापर्यंत ३०४० रूग्णांवर शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली. रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्षात आधुनिक उपकरणे असून, मोठ्या कुशलतेने वैद्यकीय तज्ज्ञ रुग्णांच्या शस्त्रक्रिया करत आहेत. गेल्या १० महिन्यात केलेल्या शस्त्रक्रियांमध्ये सर्वाधिक गरोदर माता आणि महिलांच्या विविध समस्यांच्या १६२७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या सोबतच डोळ्यांच्या ४२४, दंत २२९, अस्थी २००, या बरोबर पोट, कान, नाक, आदींच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. चार महिन्यापूर्वी गरीब कुटुंबातील एका दोन वर्षीच्या मुलीला जन्मजात मोतीबिंदू असल्याने अशी शस्त्रक्रिया करणे डॉक्टरांसाठी आव्हान होते. परंतु आव्हान पेलवत रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्रथमच दोन्ही डोळ्यांची अवघड मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून मुलीला दृष्टी दिली आहे. सहा महिन्यांपूर्वी एका महिलेच्या मणक्याची जोखमीची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयात महागड्या शस्त्रक्रिया सिव्हील रुग्णालयात होतात. गेल्या नऊ महिन्यात एकूण ३०४० शस्त्रक्रिया पैकी २३६७ अवघड शस्त्रक्रिया डॉक्टरांनी केल्या आहेत. काही वेळा महात्मा ज्योतिबा फुले ह्या जन आरोग्य योजने अंतर्गत देखील रुग्णालयात शस्त्रक्रिया होत असतात. दुर्बिणीद्वारे देखील जोखमीच्या शस्त्रक्रिया होत आहेत.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading