पंडीत हरिप्रसाद चौरसिया यांचा राम मराठे स्मृती पुरस्कारानं तर अनंत जोशी यांचा राम मराठे युवा पुरस्कारानं गौरव

पंडीत हरिप्रसाद चौरसिया यांना राम मराठे स्मृती पुरस्कार तर अनंत जोशी यांना पंडीत राम मराठे युवा पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पंडीत राम मराठे स्मृती समारोह ठाण्यात सुरू असून समारोहाच्या पहिल्याच दिवशी हरिप्रसाद चौरसिया आणि अनंत जोशी यांचा खासदार राजन विचारे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ठाण्याचे रसिक कलेवर प्रेम करणारे आहेत त्यामुळं आपल्याला पुढचा जन्म ठाण्यात घ्यायला आवडेल असे उद्गार सत्काराला उत्तर देताना पंडीत हरिप्रसाद चौरसिया यांनी काढले. चौरसिया यांचं भारतीय संगीत शास्त्रामध्ये अतुलनीय योगदान असून त्यांनी भारतीय बासरीला जगात स्वतंत्र ओळख मिळवून दिली आहे. हरिप्रसाद चौरसिया भारतीय संगीताचा करत असलेल्या अविरत प्रचाराबद्दल त्यांना संगीत भूषण राम मराठे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तर हार्मोनियम या वाद्यावर कठोर रियाजानं मिळवलेलं प्रभुत्व, हार्मोनियम वाद्याचा प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी केलेलं अध्ययन आणि हार्मोनियम वाद्यासाठी फेलोशिपचे पहिले मानकरी ठरलेल्या अनंत जोशी यांचा राम मराठे स्मृती युवा पुरस्कारानं गौरव करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading