दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत ठाण्याच्या मधुरिका पाटकरला महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात सुवर्णपदक

नेपाळ येथे सुरू असलेल्या १३व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत ठाण्याच्या मधुरिका पाटकरनं महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात सुवर्णपदक पटकावलं आहे. महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात मधुरिका पाटकर आणि श्रीजा अकुला यांनी सुतीर्थ मुखर्जी आणि अहिका मुखर्जी यांचा पराभव केला. मधुरिका पाटकर आत्तापर्यंत सातवेळा दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा खेळली असून तिने सातही वेळा सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. गेल्यावर्षी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये देखील मधुरिका पाटकर हिनं सुवर्णपदक पटकावलं होतं. मधुरिका पाटकर हिनं आत्तापर्यंत सव्वाशेहून अधिक पदकं पटकावली असून यातील १५ पदकं ही राष्ट्रीय पातळीवरील खेळासाठी आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading