नौपाड्यात क्षुल्लक कारणावरून दोन कुटुंबांमध्ये वाद

किरकोळ कारणावरून नौपाड्यातील विष्णूनगरमध्ये दोन कुटुंबांमध्ये वाद उफाळून आल्यानं दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना मारहाण केली. ठाण्यातील सुयश सोसायटीतील राहुल पैठणकर यांना दोन दिवसापूर्वी हसमुख शहा यांनी बेदम मारलं होतं. लिफ्टचा दरवाजा उघडा राहिल्यामुळे हसमुख शहा यांनी राहुल पैठणकरला मारलं होतं. आईची चप्पल अडकल्यामुळे त्यांचा लिफ्टचा दरवाजा चुकून उघडा राहिला होता. यावरून हसमुख शहा आणि त्यांच्या मुलानं पैठणकर यांना बेदम मारहाण केली. पैठणकर हे पाचव्या मजल्यावर तर हसमुख शहा हे सहाव्या मजल्यावर राहतात. सुरूवातीला लिफ्ट उशिरा येण्यावरून हा वाद झाला. नंतर हसमुख शहा यांनी पैठणकर यांना शिवीगाळही केली आणि त्यांची घाटी म्हणून संभावनाही केली. यामुळे हा वाद चिघळला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading