नौपाडा पोलीस स्टेशन गणपतीचं घोडागडीतून विसर्जन

ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशन मध्ये गेल्या 16 वर्षांपासून गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. यावर्षी त्यांचे 17 वे वर्ष आहे. दहा दिवस ठाणे पोलिसांकडून या गणपतीची मनोभावे पूजा केली जाते आणि अनंत चतुर्दशीला सर्वात आधी घोडागडीतून मासुंदा तलावात या गणपतीचे विसर्जन केले जाते. त्यानंतर लगेच पोलीस आपल्या कर्तव्यावर रुजू होतात. भक्ती आणि कर्तव्याचा मेळ या गणपतीत दिसून येतो. या मिरवणुकीच्या माध्यामातून मिरवणूक कशी असावी याचा एक आदर्श समाजाच्या समोर ठेवला जातो व पोलिसांमध्ये कौटुंबिक वातावरण निर्माण होते. ईद ए मिलाद आणि विसर्जन एकाच दिवशी आहे पण मुस्लीम बांधव ईद उद्या साजरा करणार आहेत आणि आज ठिकठिकाणी मुस्लीम बांधव विसर्जना दरम्यान हिंदू बांधवांचे स्वागत करणार आहेत. आणि यातून हिंदू- मुस्लीम ऐक्य दिसते आसे मत सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी व्यक्त केले आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading