ठाण्यात दोन दिवस पावसाची जोरदार हजेरी

ठाण्यामध्ये गेली दोन दिवस पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. या पावसामुळे सर्वसामान्य ठाणेकरांची त्रेधातिरपिट उडाली आहे. काल आणि आज सकाळी ऊन पडलं होतं मात्र संध्याकाळ नंतर जोरदार पाऊस झाला. ढगाच्या कडकडाटासह विजेच्या चमचमाटात हा पाऊस झाला. साधारणता साडेचार नंतर सुरू झालेल्या या पावसाने अनेकांची भंबेरी उडवली. दुपारी साडेचार पासून सुरू झालेल्या पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे नंतरच्या पाच तासात जवळपास 60 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आजही सकाळी कडक ऊन होतं त्यामुळे हवेतील उष्माही वाढला होता. मात्र दुपारी साडेतीन नंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे हवेत सुखद गारवा आला. ऊन पावसाच्या या खेळामुळे तब्येतीच्या तक्रारीतही वाढ झाल्याचे दिसत आहे, अनेकांना सर्दी खोकला याचा त्रास होत आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading