नौपाडा-कोपरी प्रभाग समिती कार्यक्षेत्र नागरिकांच्या वावरासाठी आज मध्यरात्रीपासून पूर्णत: बंद

नौपाडा-कोपरी प्रभाग समिती कार्यक्षेत्र नागरिकांच्या वावरासाठी आज मध्यरात्रीपासून पूर्णत: बंद करण्यात येत आहे. नौपाडा-कोपरी प्रभाग समितीत कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्रीपासून ३ मे पर्यंत बंदचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. संचारबंदी असतानाही नागरिक रस्त्यावर, दुकानांमध्ये, भाजीपाला दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत असून रस्त्यावरील वर्दळही वाढत आहे. नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नसून कोरोनाची संख्या वाढत आहे. त्यामुळे उद्यापासून मासळी, मटण विक्री दुकाने, अन्नधान्याची दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळांची दुकाने, दूध डेअरी, जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा ३ मे पर्यंत संपूर्ण बंद राहील. तर फक्त औषधांची दुकाने चालू राहतील याची नागरिकांनी नोंद घ्यावी असं महापालिकेनं कळवलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading