ओमप्रकाश दिवटे यांनी मालेगावचा कार्यभार न स्वीकारल्याबद्दल त्यांची त्वरीत विभागीय चौकशी करण्याची राजीव दत्ता यांची मागणी

ठाणे महापालिकेचे उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी मालेगावचा कार्यभार न स्वीकारल्याबद्दल त्यांची त्वरीत विभागीय चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजीव दत्ता यांनी केली आहे. नगरविकास विभागाच्या २० एप्रिलच्या पत्रानुसार ओमप्रकाश दिवटे यांना मालेगाव महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्त केले आहे. परंतु आजपर्यंत त्यांनी आपला कार्यभार स्वीकारलेला नाही. मालेगावमध्ये सध्या गंभीर परिस्थिती असून मालेगाव महापालिका ही रेड झोन मध्ये आहे. अशा परिस्थितीत सुध्दा आपल्या कर्तव्याची जबाबदारी दिवटे यांनी स्वीकारलेली नाही. त्यामुळं त्यांनी सार्वजनिक सेवेच्या नियमांचे उल्लंघन केले असून दिवटे यांना त्वरीत कायदेशीर कारवाई आणि विभागीय चौकशीसाठी जबाबदार धरण्यात यावे म्हणून राजीव दत्ता यांनी तक्रार नोंदवून कारवाईची मागणी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading