नैसर्गिक संसाधन लेखा ही काळाची गरज – सुरेश प्रभू

जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या लेखाशास्त्र विभागाने आयसीएआयच्या डब्ल्यूआयआरसी ठाणे शाखेच्या सहकार्याने आणि भारतीय लेखा संघटना- ठाणे शाखा” यांच्या संयुक्त विद्यमाने  “वित्त ,लेख कर आणि अंकेक्षणातील नवे विचारप्रवाह” या विषयावर “17 वी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद झाली. माजी केंद्रीय मंत्री  सुरेश प्रभू आणि आयसीएआय चे उपाध्यक्ष निहार जम्बुसरीया  प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ विजय बेडेकर, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ सुचित्रा नाईक आणि महाविद्यालयाचे लेखा शास्त्र विभाग प्रमुख सीए योगेश प्रसादे उपस्थित होते. परिषदेचे उद्घाटन डॉ. विजय बेडेकर यांनी केले. अकाउंट्स आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग तर आहेच पण आपलं संपूर्ण आयुष्य हे केवळ अंकांपूरते मर्यादित न ठेवता, आपण एकंदरीत ह्या शैक्षणिक प्रक्रियेतून समाजात आणि पर्यायाने देशाच्या विकासात आपलं योगदान कसं देऊ शकू ह्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. नवीन तंत्रज्ञानाचा विशुध्द वापर करावा असा संदेश डॉ. बेडेकर यांनी यावेळी दिला.
सुरेश प्रभू यांनी नैसर्गिक संसाधन लेखा काळाची गरज याविषयी माहिती दिली. त्यासोबत ऑडिटर ची जबाबदारी, सरकारी धोरणे आणि त्यासोबत निष्पक्ष आणि योग्य लेखापरीक्षण यावर वर वर त्यांनी भर दिला. आजच्या जगात ई-कॉमर्स, जी -२०, चे महत्व आणि  त्याचसोबत डायरेक्ट तथा इनडायरेक्ट टॅक्स यांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
निहार जंबुसारिया विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की, तंत्रज्ञान आता बर्‍याच भागात मानवी संसाधनांची जागा घेत आहे, म्हणून मानवी आयुष्य अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी आम्ही या तंत्रज्ञानाचा कशा प्रकारे स्वीकारू शकतो हे पाहणे गरजेचे आहे. सर्वांना या साथीच्या रोगात तंत्रज्ञानाचे महत्त्व कळले आहे असं सांगितलं. डॉ .विजय बेडेकर आणि प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक यांनी परिषदेत सादर होणाऱ्या शोधनिबंधाच्या सारांश पुस्तकाचे प्रकाशन केले. उपप्राचार्या डॉ. प्रियंवदा टोकेकर यांनी  पुढील वर्षी जानेवारी 2022 मध्ये महाविद्यालयाच्या वतीने होणाऱ्या “महिलांचे राजकीय नेतृत्व: जागतिक ते स्थानिक – आव्हाने आणि संधी” या विषयावर १८ व्या एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेची घोषणा केली.
प्रथम सत्रामध्ये “वित्त आणि अंकेक्षण क्षेत्रातील सद्यस्थिती” या विषयावर गोदरेज एग्रोवेट चे प्रमुख वित्त अधिकारी सीए वरदराज सुब्रमण्यम आणि सीए मंगेश किन्नरे यांचे भाषण झाले;  दुसऱ्या सत्रामध्ये मध्ये “शेअर क्षेत्राचे तांत्रिक आकलन” या विषयावर सीए रचना रानडे व सीए कमलेश साबू यांचे व्याख्यान झाले. परिषदेच्या तिसऱ्या सत्रात श्री मुकेश इसरानी आणि प्रा अपर्णा धर्माधिकारी यांचे भाषण झाले
या परिषदेमध्ये तज्ञ अभ्यासक संशोधक आणि विद्यार्थी यांचे शोधनिबंध यांचा देखील समावेश होता. परिषदेचा समारोप सत्रात भुटान चे श्री रजनीश रत्ना यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले असून या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनात इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया या संस्थेच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष सीए सुरेन ठाकूरदेसाई यांचे सहाय्य प्राप्त झाले आहे.
वित्त, लेखा व कर आकारणी मध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, ब्लॉक चेन , सायबर सिक्युरिटी, डेटा अनलिटिक्स इत्यादी नवीन तंत्रज्ञानाचा सध्या उपयोग होत आहे .नवीन उद्योगधंद्यांच्या स्थापनेपासून कार्य विस्तारामध्ये वित्त लेखा व कर आकारणी क्षेत्रामध्ये कॉम्प्युटर ऑटोमेशन व समाज माध्यमांचा वाढता वापर इत्यादी नवीन तंत्रज्ञानाचा जोमाने वापर होत आहे. कोरोनोत्तर काळामध्ये होणाऱ्या या नव्या बदलांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञ, अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक , विद्यार्थी व सुबुद्ध नागरिक या सर्वांनी  एकत्र येऊन विचार मंथन करण्यासाठी या  परिषदेचे आयोजन करण्यात आले असे मत महाविद्यालयाच्या लेखा विभागाचे प्रमुख सीए योगेश प्रसादे यांनी व्यक्त केले. या परिषदेत अर्थ विषयक चर्चा व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसाधारण नागरिकांचे जीवन अधिक सुखकर करण्यासाठी काय करता येईल  यावर विचार मंथन झाले असे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक यांनी व्यक्त केला.या आंतरराष्ट्रीय परिषदेला युट्यूब या आभासी माध्यमातून असंख्य विद्यार्थी प्राध्यापक संशोधक व सामान्य नागरिकांनी देखील हजेरी लावली.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading