प्रादेशिक परिवहन विभागातर्फे उद्यापासून रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन

प्रादेशिक परिवहन विभागातर्फे २२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात उद्यापासून होणार असून महिनाभर या अभियानातंर्गत रस्ते सुरक्षा विषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वभंर शिंदे यांनी सांगितले. या अभियानात मंगळवार १९ जानेवारीला वायू प्रदूषण करणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम आयोजित करण्यात आली आहे. सोमवार २५ जानेवारीला ऑटो रिक्षाचालकांसाठी कार्यशाळा होणार आहे. बुधवार २७ जानेवारीला जिल्ह्यातील विविध टोल नाक्यांवर रस्तासुरक्षक साहित्याचे वाटप करणार आहेत. शनिवार ३० जानेवारी रोजी महिलांची बाईक रॅली होईल. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरणाऱ्या या बाईक रॅलीसाठी सिने अभिनेते डॉ गिरीश ओक उपस्थित राहणार आहेत. शनिवार ६ फेब्रुवारी रोजी शालेय विदयार्थ्यांची वाहतूक करणारे चालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी कार्यशाळा होईल. मंगळवार ९ फेब्रुवारी रोजी रिक्षा, टॅक्सी चालकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन करण्यात येईल. बुधवार १० फेब्रुवारीला दुचाकी वाहनांची मोफत यांत्रिकी तपासणी शिबीर होणार आहे. बुधवार १७ फेब्रुवारी रोजी या अभियानाची सांगता होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading