निवडणुकीत उमेदवारीसाठी येणा-यांना पक्षात स्थान नाही – राज ठाकरे यांचा इशारा

निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी कोणीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करू नये असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. काल ठाण्यामध्ये राज संवाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिका-यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी हा इशारा दिला. निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी कोणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार असेल तर ते अजिबात चालणार नाही. मग जो कोणी असेल त्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करू नये असा इशारा राज ठाकरे यांनी इच्छुकांना दिला. निवडणुका जवळ आल्या की उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक मंडळी एका पक्षातून दुस-या पक्षात उड्या मारत असतात. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळं बहुधा पक्षात निष्ठेने काम करणा-या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी मिळेल असं दिसत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading