नालेसफाई नव्हे तर हात की सफाई – ठाणेकरांच्या जीवाशी खेळ असल्याचा भारतीय जनता पक्षाचा आरोप

ठाण्यातील आनंद नगर, वागळे इस्टेट, घोडबंदर रोड, बाळकुम, नळपाडा, कोपरी, श्रीरंग राबोडी परिसरातील नाले सफाईचा पाहणी दौरा आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. या पाहणी दौ-याच्या वेळी स्थानिक नागरिकांनीही नालेसफाई बाबत तक्रारी केल्या. यावेळी संजय केळकर यांनी ही नालेसफाई नसून हात की सफाई असल्याचे सांगून ठाणेकरांच्या जीवाशी महापालिका खेळत असल्याचे सांगितले. दरवर्षी नालेसफाई होतच नाही परंतु पैसे काढले जातात, करोडो रुपये पाण्यात घालण्याचे काम महापालिका करत असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले तर आमदार निरंजन डावखरे यांनी नालेसफाई फेल गेली आहे असे सांगून महापालिकेकडून नालेसफाई ७५% केली असल्याचा दावा जरी केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र नालेसफाई पाहताना ते साफ खोटं ठरलं असून भारतीय जनता पक्ष याचा तीव्र निषेध करत आहे. तसंच संबंधित अधिकाऱ्यांवर, ठेकेदारांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी दोन्ही आमदारांनी यावेळी केली आहे. नाले सफाई करत असताना कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याचे यावेळी सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading