नवीन उद्योग येण्याकरिता इतर राज्यांपेक्षा अधिक सूट राज्य देण्यासाठी तयार – उदय सामंत

राज्यामध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील असून यासाठी नवीन उद्योग येण्याकरिता इतर राज्यांपेक्षा अधिक सूट राज्य देण्यासाठी तयार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. ठाण्यामध्ये आयोजित बिझनेस जत्रेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. इतर राज्य गुंतवणुकीवर जे काही देत असेल त्यापेक्षा अधिक सूट आम्ही देऊ असं सामंत यांनी यावेळी बोलताना सांगितलं. उद्योगांचे प्रश्न मंत्रालयात बसून सोडवण्यापेक्षा उद्योग मंत्रालय उद्योजकांकडे आलं पाहिजे अशी संकल्पना आपण राबवायला सुरूवात केल्याचंही त्यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading