नववर्ष पूर्वसंध्येला राबवलेल्या विशेष मोहिमेत एकूण ६५९ जणांवर गुन्हे दाखल

ठाणे वाहतूक शाखेनं नववर्ष पूर्वसंध्येला राबवलेल्या विशेष मोहिमेत एकूण ६५९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये मद्यप्राशन करून वाहन चालवणा-यांवर कारवाई करण्यात आली. ३० तारखेला राबवलेल्या मोहिमेत पोलीसांनी मद्यप्राशन करून दुचाकी चालवणा-या १०५ वाहन चालकांवर, ५ रिक्षांवर तर ९ चारचाकींवर कारवाई करण्यात आली. तर साथीचे रोग उल्लंघन कायद्यानुसार ३८ दुचाकी स्वारांवर कारवाई करण्यात आली. ३१ तारखेला राबवलेल्या मोहिमेत मद्यप्राशन करून वाहन चालवणा-या १४२ दुचाकी स्वारांवर, १२ रिक्षाचालक तर १७ चारचाकींवर कारवाई करण्यात आली. तर साथीचा रोग प्रतिबंधक कायद्यानुसार ५६ दुचाकीस्वारांवर, ४ रिक्षा चालकांवर आणि २ चारचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली. तर मध्यरात्री १ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत मद्यप्राशन करून वाहन चालवणा-या १४७ वाहन चालकांवर, ५ रिक्षा तर १६ चारचाकींवर कारवाई करण्यात आली. तर साथीचे रोग प्रतिबंधित कायद्यानुसार ८५ दुचाकींवर, ६ रिक्षा आणि ११ चारचाकींवर पोलीसांनी कारवाई केली.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading