नववर्षाच्या पूर्वसंध्येवर स्वत: रक्तदान करून मुख्यमंत्र्यांच्या रक्तदात्यांना शुभेच्छा

एकीकडे सर्वत्र नववर्ष साजरं होत असताना ठाण्यात मात्र नववर्षाचं स्वागत रक्तदान करून करण्यात आलं. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी ३१ डिसेंबरला रक्तदान करण्याचा उपक्रम सुरू केला होता. यावर्षीही हा उपक्रम राबवण्यात आला. जांभळी नाका येथील शिवाजी मैदानात हे रक्तदान आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी रक्तदात्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांनी रक्तदात्यांचे आभार मानले. रक्त हे तयार करता येत नाही. त्यासाठी रक्तदानच करावं लागतं. आनदं दिघे यांनी सुरू केलेला हा उपक्रम महत्वाचा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading