108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेस मध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील दोन बाल वैज्ञानिकांचा सहभाग

नागपूर येथे संपन्न होत असलेल्या 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या निमित्ताने आयोजित होत असलेल्या किशोर विज्ञान काँग्रेस मध्ये राज्यातून निवडलेले दोन बाल वैज्ञानिक सहभागी झाले आहेत. हे दोन्ही संशोधन प्रकल्प, जिज्ञासा ट्रस्ट या संस्थेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक परिषदेमध्ये सर्वोत्तम ठरले होते. जव्हारच्या जयेश्वर विद्यामंदिर शाळेचा रोहित कोती हा विद्यार्थी पालघर वरिष्ठ गटातून निवडला गेला होता. नाचणी पिकाचा पौष्टिक अन्नधान्य म्हणून अभ्यास हा त्याच्या प्रकल्पाचा विषय होता. तर कनिष्ठ गटातून निवडला गेलेला बाल वैज्ञानिक
उत्तम फुदे हा ठाण्याच्या सरस्वती सेकंडरी स्कूलचा विद्यार्थी आहे. इकोसिस्टीम आणि आरोग्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग हा त्याच्या प्रकल्पाचा विषय होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading