नवरात्रीच्या काळात ८ ते १४ ऑक्टोबर दरम्यान पालकमंत्र्यांतर्फे महारक्तदान सप्ताहाचे आयोजन

शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला टेंभी नाक्याचा नवरात्रौत्सव हे तमाम देवीभक्तांच्या श्रद्धेचे स्थान. पारंपरिक पद्धतीने साज-या होणाऱ्या या नवरात्रौत्सवाची देवीभक्त वर्षभर आतूरतेने वाट बघत असतात. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचा हा वारसा पुढे सुरू ठेवत यंदा त्याला समाजकारणाची जोड दिली आहे. गेले दीड वर्षाहून अधिक काळ सुरू असलेला कोरोनाचा कहर आणि त्यामुळे राज्यभरात निर्माण झालेली रक्ताची टंचाई लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून नवरात्रीच्या काळात ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत महारक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. यालाच अनुसरून एकनाथ शिंदे यांनी यंदा नवरात्रीचे औचित्य साधून महारक्तदान सप्ताह आयोजित करण्याचा संकल्प सोडला. त्यानुसार शिवसेना ठाणे आणि पालघर जिल्हा शाखेच्या वतीने या महारक्तदान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत हा रक्तदान सप्ताह होणार आहे. ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय आणि स्टेट ब्लड ट्रान्स्फ्युजन कौन्सिल यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading