धावत्या चारचाकी वाहनाने घेतला पेट

घोडबंदर रोडवरील तत्वज्ञान विद्यापीठ येथील विहंग हॉटेल जवळ एका धावत्या चारचाकी वाहनाने पेट घेतल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली. वाहन चालक संजय पुराणिक हे मानपाडा येथून वागळे इस्टेट येथे जात असताना ही घटना घडली आहे. यावेळी पुराणिक हे गाडीतून एकटेच प्रवास करत असून प्रसंगावधान राखत त्यांनी वेळीच गाडीला रस्त्याच्या बाजूला उभी केल्यामुळे कुठलीही दुखापत अथवा जीवितहानी झाली नाही. मात्र दोन गाड्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेत आग लागलेल्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बाजूला पार्क केलेल्या गाडीचे प्लॅस्टिक च्या वस्तू वितळून गेल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच कापूरबावडी वाहतूक पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेत ही आग पूर्णपणे विझविली.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading