ठाण्यामध्ये गेल्या 24 तासात 108 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. काल सकाळपासून शहरात रिमझिम पाऊस सुरू होता. मात्र सकाळी साडेचार पासून साडेआठ पर्यंत जवळपास 70 मिलिमीटर पाऊस झाला. या जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं होतं. आत्तापर्यंत १ जून ते 17 जुलै पर्यंत ११९८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात 1285 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.