दैनंदिन ठेव योजनेच्या वसुलीचं काम सोपवलेल्या तरूणानं लाखो रूपयांचा अपहार केल्याचा प्रकार

दैनंदिन ठेव योजनेच्या वसुलीचं काम सोपवलेल्या तरूणानं लाखो रूपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ठाण्यातील सिटीझन को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीमध्ये पिग्मी एजंट म्हणून काम करणा-या प्रशांत पाटील यांनी कामाच्या वाढत्या व्यापामुळे दैनंदिन रक्कम वसूल करण्यासाठी अक्षय भोसले याची नियुक्ती केली होती. गेली ३ वर्ष अक्षय हा ३० ते ३५ खातेदारांची रक्कम रोज गोळा करत होता. मंदार कदम हे खातेदार पतपेढीत पासबुक अपडेट करण्यासाठी गेले असता त्यांना त्यांच्या खात्‍यात १३ हजारांची रक्कम जमा झाली नसल्याचं लक्षात आलं. त्यानंतर इतरही पाच खातेदारांच्या खात्यातील एकूण २ लाख १८ हजारांची रक्कम पतपेढीत जमा झाली नसल्याचं समोर आलं. या रक्कमेचा अपहार अक्षय भोसलेनंच केल्याचं उघड झाल्यानं त्याच्या विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading