देवरूख येथे झालेल्या उन्हाळी शिबिरामध्ये बालकांनी घेतली भ्रष्टाचाराविरोधात शपथ

४० लहान बालकांनी भ्रष्टाचाराविरोधात शपथ घेतली. ९ ते १४ वयोगटातील या बालकांनी देवरूख येथे झालेल्या उन्हाळी शिबिरामध्ये ही शपथ घेतली. शिबिरातील बालकांनी हातात तिरंगा फडकवत भ्रष्टाचाराविरोधात शपथ घेतली. भ्रष्टाचाराला पाठिंबा देणार नाही, भ्रष्टाचार वाढू देणार नाही आणि भ्रष्टाचार होऊ देणार नाही अशी एक सुरात या बालकांनी शपथ घेतली. यावेळी या बालकांचे पालकही उपस्थित होते. अशाप्रकारचा संदेश समाजात गेल्यास भ्रष्टाचाराला आळा बसू शकतो असे विचार या शिबिराचे प्रमुख अजित तेलंग यांनी व्यक्त केले. शिबिरातील बालकं आपल्या पाल्यांनाही भ्रष्टाचारापासून अलिप्त राहण्यासाठी प्रवृत्त करतील असं तेलंग यांनी सांगितलं. २००७ पासून आपण समाजात हा संदेश देण्याचा प्रयत्न करत असून त्यावेळी ७ बालकं उपस्थित होती. त्यानंतर २०१३ मध्ये देवरूखच्या चौकातही अशी शपथ देण्यात आली होती. त्यावेळी अशा प्रयत्नांना पाठिंबा देण्याचं आवाहन त्यांनी अण्णा हजारेंना केलं होतं. राजकीय व्यक्तींना बदलवण्यापेक्षा लहान मुलांमध्येच हे विचार रूजले तर त्याचे चांगले परिणाम होऊ शकतील असंही तेलंग यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading