दिवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई

दिवा प्रभाग समिती परिसरात कोविड कालावधीत झालेली अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार दिवा विभागातील कांदळवनात अनधिकृपणे बांधण्यात आलेल्या चाळी आणि वाणिज्य बांधकामे तोडण्याची कारवाई पोलीस बंदोस्तात नुकतीच करण्यात आली. काही बांधकामे ही खाडीकिनारी असलेल्या कांदळवनात करण्यात आली होती, त्यामुळे पर्यावरणाचा देखील ऱ्हास होत होता. याबाबत पर्यावरणप्रेमींनी महापालिकेकडे तक्रार केली होती, कोविडचा प्रभाव कमी झाला असून, महापालिका कार्यक्षेत्रात झालेल्या अनधिकृत बांधकामांचा आढावा घेवून त्यावर त्वरीत कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार दिवा प्रभागसमिती क्षेत्रात झालेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू करण्यात आली होती. अनधिकृत बांधकामांसंदर्भात जबाबदार असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी सातत्याने होत होती. परंतु याबाबत चौकशी केली असता, प्रभागसमितीचे सहाय्यक आयुक्त हे जानेवारी महिन्यात वैदयकीय कारणास्तव रजेवर असताना, या कामांना दिवा प्रभाग समितीतील कर्मचाऱ्याने परवानगी दिली असल्याची बाब निदर्शनास आल्यावर चौकशीअंती लिपीक अमित गडकरी यांना तात्काळ निलंबित करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading