दिवा गावातील साबे येथील कांदळवन हटवून बांधण्यात आलेल्या १५ अनधिकृत खोल्या जमिनदोस्त

दिवा गावातील साबे येथील कांदळवन हटवून बांधण्यात आलेल्या १५ अनधिकृत खोल्या महापालिकेच्या अतिक्रमण पथकानं जमिनदोस्त केल्या. महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामं, फेरीवाले, हातगाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार अतिक्रमण विरोधी पथकाकडून मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रातील अनधिकृत बांधकामं, स्टॉलवर धडक कारवाई केली जात आहे. त्यानुसार डीजे कॉम्प्लेक्स येथील कांदळवन हटवून सुनिल यादव यानं १५ आरसीसी खोल्यांचं बांधकाम केलं होतं. जेसीबीच्या सहाय्यानं या खोल्या जमिनदोस्त करण्यात आल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading