दिवावासीयांना लवकरच पाणी दिलासा

दिवा वासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. दिवा शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती. त्यामुळे हि समस्या लक्षात घेत पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून २२१ कोटीचा दिवा – मुंब्रा रिमॉडलिंग हा प्रकल्प सुरू आहे. त्यामधील दिवा शहरासाठी ५ किलोमीटर लांबीची मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यातील अवघे ९५० मीटर काम शिल्लक होते. यात पलावा मधील ७५० मीटर जलवाहिनीचे काम काही तांत्रिक कारणास्तव रखडलेले होते. या जलवाहिनीचे काम करण्यासाठी आवश्यक ना हरकत दाखला गेल्या अनेक दिवसांपासून मिळत नव्हता. त्यामुळे या ठिकाणी पाइपलाईन टाकण्याचे काम रखडले होते. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नामुळे अखेर हा दाखला नुकताच मिळाला. त्यामुळे शनिवारी दिवा शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी कल्याण शीळ रस्त्यावर असलेल्या पलावा गृह प्रकल्पापासून दिव्यापर्यंत स्वतंत्र ८०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या जलवाहिनीमुळे दिवा वासीयांना लवकरच दिलासा मिळणार आहे. यापूर्वी पाईपलाईन १८ मिलिमीटरची होती, परंतु आता ती ३२ मिलीमीटरची करण्यात आली आहे. तसेच उर्वरित २५० मीटरच्या कामाला देखील लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याने दिव्याचा पाणी प्रश्न निकाली लागणार असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading