दिल्लीत युपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांचे प्रयत्न

दिल्लीत युपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. अशी माहिती माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली. दिल्लीत अडकलेल्या सर्व मराठी विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खरगे आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात श्रीकांत शिंदे होते. या विद्यार्थ्यांना विशेष ट्रेनने किंवा ST बसेसच्या माध्यमातून परत आणण्यासाठी शासनस्तरावर लवकरच योग्य निर्णय होईल असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. दिल्लीतील करोलबाग, ओल्ड राजेंद्रनगर भागात UPSC परीक्षेची तयारी करण्यासाठी देशभरातून हजारो विद्यार्थी येतात. महाराष्ट्रातील जवळपास 1500 विद्यार्थी सध्या दिल्लीत UPSC स्पर्धा परीक्षा तयारी करत आहेत. यातील काही विद्यार्थ्यांनी शिंदे यांच्याशी संपर्क साधून महाराष्ट्रात येण्याची इच्छा व्यक्त केली. याला तात्काळ प्रतिसाद देत विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि सर्वोतोपरी मदत करण्यात येईल असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी या विद्यार्थ्यांना दिला. दिल्लीत अडकलेल्या मराठी तसेच अमराठी विद्यार्थ्यांची एकनाथ शिंदे यांच्यातर्फे जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading