कोविड १९ चा संसर्ग कमी करण्यासाठी ठाणे महापालिकेतर्फे विविध उपाययोजना

कोविड १९ चा संसर्ग कमी करण्यासाठी ठाणे महापालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी कोविड आणि नॉन कोविड रुग्णांची सरमिसळ होऊ नये यासाठी या दोन्ही रुग्णांसाठी वेगवेगळ्या हॉस्पीटलची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
शासकीय रूग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच होरायझन प्राईम, वेदांत हॉस्पिटल घोडबंदर रोड, कौशल्य हॉस्पिटल ही खाजगी हॉस्पिटल कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आली आहे.
कोविड सदृश्य लक्षणे दिसत नसलेल्या कोविड रुग्णांसाठी भायंदरपाडा येथील डी विंग तसेच हॉटेल लेरीडा, हॉटेल जिंजर आणि सफायर हॉस्पिटल, खारीगांव हे कोविड केअर सेंटर म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे संशयित रुग्णांना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी संशयित रुग्णांच्या उपचारासाठी भाईंदरपाडा येथे स्वतंत्र बेड, टॉयलेट सुविधा असलेल्या इमारतीमध्ये अशा रुग्णांची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. तसेच बेथनी हॉस्पिटल हेही संशयित रुग्णासाठी घोषित करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच अन्य काही खाजगी हॉस्पीटल अन्य रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी नॉन कोव्हीड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.
33 प्रभागांमध्ये फिवर ओपीडी सुरु करण्यात आल्या आहेत. त्यासाठी आयएमए कडील खाजगी डॉक्टरांची सुविधा उपलब्ध आहे.
बाधित रुग्णांच्या संपर्कातील लो रिस्क आणि हाय रिक्स व्यक्ती शोधून काढण्यासाठी महापालिकेचे सर्व अधिकारी दिवसरात्र काम करीत आहेत. जेणेकरुन अन्य ठिकाणी होणारा प्रादुर्भाव संसर्ग थांबविण्यात येईल.
बाधित रुग्ण रहात असलेल्या परिसरातील सर्व रहिवाशांच्या कोविड सदृश्य लक्षणाबाबत सर्व्हे करण्यात येत आहे.
ठाणे महापालिकेच्या सी.आर.वाडीया रुग्णालय येथे कोविड चाचणी लॉब सुरु करण्यात आली आहे. ही सुविधा मोफत असून ICMR आदेशानुसार लक्षणे आढळल्यास तपासणीची शिफारस सक्षम डॉक्टरमार्फत करण्यात येते.
कॅडबरी जंक्शन आणि कळवा खारीगांव येथे ड्राईव्ह थ्रु स्वॅब कलेक्शन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
मोठया संख्येने रुग्ण आढळून आलेल्या परिसरास हॉटस्पॉट म्हणून घोषित करुन त्याठिकाणी सर्व प्रकारच्या सामान्य गती विधी बंद करुन होम डिलीव्हरीद्वारे जीवनावश्यक वस्तु पुरवठा करण्यात येत आहे.
नागरिकांकडुन सहभाग मिळणार नाही तोपर्यत अशा विविध उपाययोजना करुनही कोरोना रुग्णांवर प्रभावी नियंत्रण मिळणे शक्य होणार नाही हे विचारांत घेता सर्व नागरिकांनी शासनाने पारित केलेले नियम आणि अटींचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading