तापमानाचा पारा घसरल्यामुळे ठाणेकर गारठले

गेल्या दोन दिवसांपासून ठाणे आणि आजूबाजूचा परिसर थंडीनं गारठून गेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून हवेतील गारठ्यात कमालीची वाढ झाली आहे. तापमानाचा पारा १४ अंश सेल्सियसच्या खाली घसरला आहे. काल तसंच शनिवारीही काही ठिकाणी अगदी हलकासा पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळं तापमान घसरलं आहे. काल तर ढगाळ वातावरणामुळे आणखी गारवा वाढला होता. संध्याकाळच्या सुमारास अगदी काही काळ सूर्यदर्शन झालं. सकाळपासून धुक्याची दुलई पांघरल्याचं चित्र शहरात दिसत होतं. अगदी दुपारनंतरही अनेक ठिकाणी धुकं जाणवत होतं. आजही हवेतील गारठा कायम असून अगदी दुपारच्या सुमारासही हवेतील गारवा जाणवत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading