उपवन येथे बुडून दोन युवकांचा मृत्यू

ठाण्यातील उपवन येथे बुडून दोन युवकांचा मृत्यू झाला. ठाण्यातील उपवन जवळ असलेल्या फायरिंग रेंज ग्राऊंडजवळ असलेल्या डबक्यात गौतम वाल्मिकी आणि निर्भय चोहान हे पोहायला म्हणून गेले होते. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे दोघे या डबक्यात बुडाले. हे वृत्त कळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं धाव घेऊन त्वरीत शोध मोहिम सुरू केली. बराच शोध घेतल्यानंतर या दोघांचे मृतदेह हाती लागले. गौतम वाल्मिकी हा शास्त्रीनगर येथील रहिवासी असून निर्भय चोहान हा उत्तर प्रदेश वरून दोन दिवसांपूर्वीच गौतमच्या घरी आला होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading