तलावपाळी जवळील इमारतीत लागलेल्या आगीतून ज्येष्ठ व्यक्तींची सुटका

तलावपाळी जवळील धवल छाया या इमारतीच्या दुस-या मजल्यावर लागलेल्या आगीत अडकलेल्यांची सुटका करण्यात आपत्ती व्यवस्थापन कक्षाला यश आलं आहे. सुमारे पावणे पाचच्या सुमारास राम मारूती क्रॉस रस्त्यावरील धवल छाया या इमारतीच्या दुस-या माळ्यावर आग लागली होती. या आगीत काही वृध्द व्यक्ती अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांनी धाव घेतली आणि ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर या आगीमध्ये अडकलेल्या काही ज्येष्ठ व्यक्तींची सुटका करण्यातही अग्निशमन दलाला यश आलं. सुदैवानं प्राथमिक माहितीनुसार या आगीत कोणतीही हानी झाली नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading