वर्तकनगर येथील प्रतिशिर्डी समजल्या जाणा-या साईबाबा मंदिराचा ३६ वा वर्धापन दिन

प्रति शिर्डी समजल्या जाणाऱ्या वर्तक नगर येथील श्री साईनाथ सेवा समिती मंडळाच्या साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन 17 ते 19 नोव्हेंबर दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. बळीराम नईबागकर यांनी 1986 साली वर्तक नगर येथे साईबाबा मंदिराची स्थापना केली, श्री साईनाथ सेवा समिती आणि सर्व साईभक्त गेली 35 वर्ष मोठ्या भक्तीभावाने साईबाबांचा वर्धापन दिन साजरा करत आले आहेत, गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे साईनाथ सेवा समितीच्या साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला. वर्तक नगर येथील श्री साईनाथ सेवा समिती मंडळाच्या साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन आजपासून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या उत्सवाला असंख्य साई भक्त ठाणे शहरातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साईंच्या दर्शनासाठी येत असतात त्या साई भक्तांना प्रसाद म्हणून लाडू देण्यात येणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध यज्ञ, भजन, महिलांसाठी विविध कार्यक्रम अशा कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे अशी माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading