एका तरूणानं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका महिलेचे प्राण वाचू शकले. आज दुपारच्या सुमारास तलावपाळी परिसरात अनुराधा रांगणेकर या महिलेनं कोणाला समजायच्या आत तलावामध्ये उडी मारली. त्याचवेळी आकाश शिंदे हा तरूण तिथून जात होता. त्याने हे पाहताच तात्काळ तलावात उडी मारून रांगणेकर यांचे प्राण वाचवले. अनुराधा रांगणेकर या तीन पेट्रोल पंप परिसरात राहणा-या असून विचित्र आजाराने ग्रासल्यामुळे त्यांनी असं कृत्य केल्याचं सांगण्यात आलं.