डोंबिवली पोलिसांनी अवघ्या १० मिनिटांत एका महिलेचा फोन दिला शोधून

डोंबिवली पोलिसांनी अवघ्या १० मिनिटांत एका महिलेचा फोन शोधून दिला आहे. अमेरिके वरून आलेल्या अनघा फाल्गुने यांनी डोंबिवलीतील फडके रोडवरून एमआयडीसीच्या दिशेने जाणारी रिक्षा पकडली. यावेळी रिक्षातून उतरल्यावर त्यांच्या लक्षात आले की त्यांचा मोबाईल हा रिक्षातच राहिला. यासंदर्भात त्यांनी तात्काळ डोंबिवली पोलीस ठाणे गाठत याची माहिती पोलीसांना दिली. पोलिस हवालदार विशाल वाघ आणि कॉन्स्टेबल नितीन सांगळे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार क्षणाचाही विलंब न कारता तात्काळ रिक्षाचा शोध सुरू करत अनघा फाल्गुने यांचा रिक्षात हरवलेला मोबाईल अवघ्या १० मिनिटात शोधून काढला. यावेळी अमेरिके वरून आलेल्या अनघा फाल्गुने यांनी पोलिसांचे आभार मानले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading