डोंबिवली एमआयडीसीतील कंपनी मालकांना अंतिम जप्तीची नोटीस

डोंबिवली एमआयडीसीतील कंपनी मालकांना कल्याण डोंबिवली महापालिकेने मालमत्ता कर भरण्यासाठी वारंवार आव्हान करत नोटीस पाठवून उद्योजकांनी भूखंड मालमत्ता कर न भरल्याने अखेर महानगरपालिकेने उद्योजकांना अंतिम जप्तीची नोटिस बजावली आहे. या जप्तीच्या नोटिसांमुळे कंपनीचे मालक हवालदिल झाले असून जप्तीच्या कारवाईमुळे धास्तावले आहेत. तर या संदर्भात कामा संघटना आणि उद्योजकांचे शिष्टमंडळाने पालिका अधिकाऱ्याची भेट घेऊन उद्योजकांना दिलासा देणारी कर दुरुस्ती प्रणाली महापालिकेच्यावतीने करण्यात यावी असे निवेदन दिले आहे. तर या बाबत पालिका अधिकाऱ्यांनी वारंवार संबंधित कंपनी चालकांना कर भरण्याचे आव्हान करून नोटीस बजावली असून यावर कंपनीकडून कुठल्याचं प्रकारे कर भरत नसल्याने जप्तीची नोटीस काढली असल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading