डोंबिवलीत एकतर्फी प्रेमातून हत्येचा प्रयत्न करणा-या आरोपीस अटक

डोंबिवली पूर्व येथे एकतर्फी प्रेमातून हत्येचा प्रयत्न करणा-या आरोपीस पोलीसांनी अटक केली आहे. १४ एप्रिलच्या मध्यरात्री एकतर्फी प्रेमातून जिग्नेश जाधव याने २५ वर्षीय महिलेला रस्त्यात थांबवले आणि तू मला आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करेल, तू माझ्याबरोबर ये असे सांगितले. या महिलेने विरोध केल्याने तो राग मनात धरून जिग्नेश जाधव याने महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर अजूनही कळव्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिग्नेश जाधव हा नाशिक येथे लपला असल्याची गुप्त माहिती टिळकनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी नाशिक येथून त्याला अटक केले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला न्यायालयाने २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading