जिज्ञासा ट्रस्टतर्फे हिमालयन साहस शिबीराचं आयोजन

जिज्ञासा ट्रस्टतर्फे हिमालयन साहस शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. जिज्ञासा ट्रस्टचे सुरेंद्र दिघे १९९४ पासून अशा शिबीरांचं आयोजन करत आहेत. यावर्षी २३ मुलं आणि २५ मुली असा चमू होता. मनाली येथे १४ दिवसांचं हे शिबीर करून नुकताच हा चमू ठाण्यात परतला आहे. १९७३ ला प्रथम इथल्या गिर्यारोहण संस्थेत बेसिक कोर्स करण्यास मनाली येथे गेलो होतो त्याला ५०वर्षे होतील असं सुरेंद्र दिघे यांनी सांगितलं. गेल्या ५० वर्षात, सुरवातीस विविध हिमालयन मोहिमेच्या निमित्ताने आणि १९९४ पासून जिज्ञासाच्या मुला- मुलींचा ग्रुप घेऊन नियमितपणे येत राहिलो. जिज्ञासाचे जुने नवीन सहकारी, आणि जिज्ञासू विद्यार्थी यांच्या अगणित न संपणाऱ्या आठवणी या शिबीरांशी जोडल्या गेल्या आहेत. शेकडो मुले अजूनही संपर्कात आहेत.त्यांच्या बरोबर बोलताना हटकून या आठवणींना उजाळा मिळत असतो असं ते म्हणाले. यावर्षी आलेली मुले करोना महामारीच्या काळातील मुले होती. त्यांची ७वी, ८वी, आणि ९ वी चे अर्धे वर्ष असे उमेदीची वर्षे करोना काळात घरात कोंडल्या अवस्थेत गेली होती. एका अर्थी स्वमग्न असलेल्या या मुलांना घराच्या बाहेर मिळालेले हे स्वातंत्र्य कसे एन्जॉय करावे हे पण कळत नव्हते. आम्हाला नातवडांच्या वयाच्या असलेल्या या मुलांना समजून घेण्यात आमचा वेळ आणि शक्ती बरीच कामी आली तरी पण त्यांच्या बरोबर १४ दिवस राहून आम्ही परत एकदा एक वर्षांनी तरुण होत गेलो पुढच्या वर्षीची तयारी करण्यासाठी असं सुरेंद्र दिघे आणि सुमिता दिघे यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading