डोंबिवलीतील ८० हजार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली

संक्षिप्त पुनरिक्षण करत नाव आणि फोटो नसलेल्या मतदारांना शेवटची संधी देत, नव्या मतदारांना नोंदणीसाठी उपजिल्हाधिकारी वैशाली परदेशी यांनी आवाहन केले आहे. मतदार यादीत फोटो नसलेल्या डोंबिवलीतील ८० हजार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडे संक्षिप्त पुन: निरीक्षण कार्यक्रम आखण्यात आला आहे. यानुसार २७ ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असून यावर ९ डिसेबर पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारल्या जातील तर नव्याने नोंदणी देखील करता येणार असून १८ वर्षावरील ज्या मतदारांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवून घ्यावीत असे आवाहन मतदार नोंदणी आधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. डोंबिवली विधानसभा मतदार संघात २६८ मतदार केंद्रे असून २ लाख ६५ हजार ८६९ मतदार असून ज्या मतदारांना मतदार यादीतील नोंदणी बाबत हरकत असेल त्यांनी आक्षेपाबाबतचा ७ नंबरचा अर्ज भरावा यावर सुनावणी घेत पाच जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणार असल्याने नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार नोंदणी करून घ्यावी असे आवाहन उपजिल्हाधिकारी वैशाली परदेशी त्यांनी केले आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading