पुढील वर्षी अधिक उत्साहात आणि जोमात गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करणार

पुढील वर्षी अधिक उत्साहात आणि जोमात गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते,आनंद परांजपे यांनी व्यक्त केले. यावेळी एकविरा मित्र मंडळ, महागिरी या गणेशोत्सव मंडळाने संपूर्ण ठाणे शहरातुन ‘बाप्पाची आरास स्पर्धे’त रोख रुपये ५१, हजार आणि आकर्षक चषकाचे पहिले बक्षीस पटकाविले. राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने “बाप्पाची आरास स्पर्धा २०२३” चे आयोजन ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विरु वाघमारे आणि कार्याध्यक्ष संदेश पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी आनंद परांजपे बोलत होते. ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे अवघ्या चार दिवसात पहिल्यांदाच ऑनलाईन गणेशोत्सव स्पर्धेचे, “बाप्पाची आरास स्पर्धा २०२३” चे आयोजन करण्यात आले होते. यामुळे स्पर्धेत काही त्रुटी, कमी असू शकतात पण याही स्थितीत ‘बाप्पा आरास स्पर्धे’त ठाणे शहरातुन ५० हून अधिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला. पुढील वर्षी योग्य नियोजन करुन गडकरी रंगायतन सभागृह भरुन दाखवू . पुढील वर्षी अधिक उत्साहात आणि जोमात गणेशोत्सव स्पर्धेच्या बक्षिस समारंभाचे आयोजन करु, असे आनंद परांजपे म्हणाले. तर प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी म्हटले की, कामातुन ओळख निर्माण करायला हवी. ‘बाप्पा आरास स्पर्धा’ हा एक प्रयोग आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी यांसारखे उत्सव तसेच सामाजिक कामात नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या मागे उभे रहाण्याची शिकवण आदरणीय नेते यशवंतराव चव्हाण, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खा. सुनीलजी तटकरे यांनी आम्हाल दिली आहे. ‘बाप्पा आरास स्पर्धा’ पारितोषिक विजेते मंडळ : संपूर्ण ठाणे शहर- प्रथम विजेते – एकविरा मित्र मंडळ-महागिरी (रुपये ५१, हजार रोख आणि आकर्षक चषक), ठाणे विधानसभा क्षेत्र – प्रथम- विजेते गोपाळ गणेश मित्र मंडळ-कॅसल मिल (रुपये २१,हजार /- आणि आकर्षक चषक) द्वितीय- सिद्धेश्वर तलाव साई सेवा मित्र मंडळ ( रुपये ११, हजार-आणि आकर्षक चषक), कोपरी पांचपाखाडी विधानसभा क्षेत्र- प्रथम- प्रादेशिक मनोरुग्णालय सार्वजनिक मित्र मंडळ (रुपये २१,हजार आणि आकर्षक चषक), द्वितीय -नवयुग मित्र मंडळ- पारशीवाडी (रुपये ११, हजार /-आणि आकर्षक चषक ), कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्र प्रथम- युवा जल्लोश मित्र मंडळ- खारीगाव (रुपये २१, हजार /- आणि आकर्षक चषक), द्वितीय -सेंटर रेल्वे काॅलनी उत्सव मंडळ-कळवा (रुपये ११, हजार /-आणि आकर्षक चषक).

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading