डोंबिवलीतील काही मार्गांवर प्रायोगिक तत्वावर नो पार्किंग आणि सम विषम पार्किग व्यवस्था

डोंबिवलीतील गजबंधन पाथली रोड, संतवाडी, लक्ष्मीबाई नेरुरकर रोड या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या परिसरात प्रायोगिक तत्वावर वाहने लावण्यास प्रतिबंध (नो पार्किंग) तसेच सम विषम तारखेस पार्किंग व्यवस्था राबविण्यात येणार असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

            डोंबिवली वाहतूक उप विभागाच्या हद्दीतील नवकार सोसायटी, गजबंधन पाथली रोड, डोंबिवली पूर्व हा रस्ता डोबिवली शहरास जोडणारा एक मुख्य रस्ता असून सदर रोडवरील अनधिकृत पार्किंगमुळे तेथील नागरिकांना, व्यावसायिकांना तसेच इतर सर्व सामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागत आहे. तसेच संतवाडी, चोळेगाव, ठाकुर्ली, डोंबिवली पूर्व हा रस्ता ठाकुर्ली रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता असून सदर रस्त्याचा वापर डोंबिवली शहरातील व इतर ठिकाणी कामाला जाणारा कर्मचारी वर्ग करत असून सदर रोडवरील अनधिकृत पार्किंगमुळे तेथील रहिवासी नागरिकांना, रेल्वे स्थानकातून डोंबिवली शहरात इतरत्र जाणारे नागरिकांना वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागत आहे. त्यातच पार्किंग करणारे वाहनधारक व तेथील रहिवासी यांच्यात गाड्या पार्किंगच्या कारणावरून वाद निर्माण होत आहेत. त्याचप्रमाणे लक्ष्मीबाई नेरूरकर रोड परिसरातील इमारती, चाळी, शाळा, व्यावसायिक दुकाने, दवाखाने, गार्डन, गॅरेज असून सदर ठिकाणी शाळा सुटण्याचे व भरण्याचे वेळेत, शाळांच्या मोठ्या बसेस व इतर खाजगी पार्क केलेल्या वाहनामुळे वाहतूक कोंडी होवू नये, वाहतूक सुरळीत व सुनिश्चित होण्यासाठी खालील ठिकाणी वाहने लावण्यास प्रतिबंध (नो पार्किंग), पी-1 व पी-2 पार्किंग व्यवस्था प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत असल्याची असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

            नो पार्किंगचे ठिकाण :- गजबंधन पाथर्ली रोड, डोंबिवली पूर्व येथील  नवकार सोसायटीचे उजवे बाजूस 50 मीटर व डावे बाजूस 50 मीटर अशा 100 मीटर परिसरात व संतवाडी, चोळेगाव रस्ता, ठाकुर्ली, डोंबिवली पूर्व 100 मीटर परिसरात 24 तास नो पार्किंग करण्यात येत आहे.

            पी – 1 पार्किंग व्यवस्था :- दत्तनगर चौक ते स्वामी विवेकानंद विद्यालय, लक्ष्मीबाई नेरुरकर रस्त्याचे उजवे बाजूस 150 मीटर परिसरात 24 तास पी – 1 पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे.

            पी – 2 पार्किंग व्यवस्था :- दत्तनगर चौक ते स्वामी विवेकानंद विद्यालय, लक्ष्मीबाई नेरुरकर रस्त्याचे उजवे बाजूस 150 मीटर परिसरात 24 तास पी – 2 पार्किंग व्यवस्था करण्यात येत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading