ठाण्यातील उन्नती वैरागीला विभागीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक

ठाण्यातील उन्नती वैरागीनं विभागीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. उन्नती ही ठाणे पोलीस स्कूलमध्ये नववीत शिकत आहे. वयाच्या ५ व्या वर्षापासून ती कराटेचे प्रशिक्षण घेत असुन ब्लॅक बेल्ट २ पर्यंतचे प्रशिक्षण झाले आहे. गेल्या तीन महिन्यापासून ती sqay martial arts चे प्रशिक्षण घेत होती. उन्नती स्वतः ला फिट ठेवण्यासाठी आणि stamina वाढविण्याकरीता सकाळी साडेचारला उठून स्किपींग करून स्ट्रेचिंग चा सराव करते. उन्नतीने जिल्हा स्तरीय स्पर्धे मध्ये सुवर्णपदक मिळवून विभागीय स्पर्धेत प्रवेश मिळवला. तसंच या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून तिने राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळविला होता. नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत तिने रौप्य पदक पटकावलं आहे. ठाणे महानगर पालिका क्षेत्रातून ठाणे पोलिस स्कूलची उन्नती ही एकटीच रौप्य पदक विजेती ठरली आहे. उन्नतीचे वडील दिपक वैरागी हे ठाणे पोलिस दला मध्ये कार्यरत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading