डॉ. वा ना बेडेकर इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजला नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिशन म्हणजेच एनबीएची मान्यता

विद्या प्रसारक मंडळाच्या डॉ. वा ना बेडेकर इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजला नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिशन म्हणजेच एनबीएची मान्यता मिळाली आहे. या संस्थेमध्ये मुंबई विद्यापीठाचा दोन वर्षाचा मास्टर्स इन मॅनेजमेंट स्टडीज हा पूर्णवेळ अभ्यासक्रम शिकवला जातो. या वर्षापासून पुढील ३ वर्षासाठी एनबीएची मान्यता मिळाली आहे. ब्रिम्सला २०१९ मध्ये नॅशनल अॅसेसमेंट अँड अॅक्रेडिशन कौन्सिलचीही मान्यता मिळाली आहे. एनबीएची मान्यता ही तांत्रिक गुणवत्ता मानांकनाचे प्रमाणिकरण करते. ज्या संस्था उत्तम ज्ञान, कौशल्य आणि दृष्टीकोन प्रदान करत आहेत. शिवाय विद्यार्थ्यांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळवून देत आहेत अशा मान्यताप्राप्त संस्थेमध्ये पदवीला अधिक मूल्य जोडले जाते. एनबीएच्या समितीनं अलिकडेच संस्थेला भेट दिली होती. या भेटीमध्ये सर्व प्रकारचा आढावा घेतला जातो. ब्रिम्स ही संस्था विद्यार्थ्यांना दर्जेदार मूल्यकेंद्रीत व्यवस्थापन शिक्षण देण्याचा प्रयत्न करते. आता एनबीएनं देखील त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading