ठाणे ते सिद्धीविनायक अशा गणेशोत्सव सायकल राईडचे आयोजन

महाराष्ट्रात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा या हेतूसाठी आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनने आगामी इकोफ्रेंडली गणेशोत्सवाचे औचित्य साधून ठाणे ते सिद्धीविनायक अशा गणेशोत्सव सायकल राईडचे आयोजन केले होते. ठाणे, मुंबई, कल्याण- डोंबिवली येथून सर्व सायकलप्रेमी सहभागी झाले होते. सकाळी आनंद नगर जकात नाका येथून निघालेली सायकल राईड ही सिद्धिविनायक मंदिर येथे समाप्त झाली. यावेळी राईड समाप्त झाल्यावर सर्व सायकलप्रेमींनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर या राईडमागच्या उद्देशासाठी सायकलप्रेमींचे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासकडून कौतुक करण्यात आले. यावेळी आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनने आयोजित केलेल्या बेस्ट स्लोगन स्पर्धेचे ललित गोलटकर हे मानकरी ठरले. त्यांना श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे विश्वस्त राजाराम देशमुख यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेचे परिक्षण संस्थेचे ज्येष्ठ सायकलप्रेमी सतिश जाधव यांनी केले. यावेळी देशमुख यांचा संस्थेचे सचिव दिपेश दळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समीर काणेकर यांच्या समीर केटरर्सकडून सर्व सायकलप्रेमींसाठी अल्पोपहारची सोय करण्यात आली होती. दरम्यान, संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी राईड मागचा उद्देश विशद करुन सर्वांचे आभार मानले. राईडचे नेतृत्व तुषार डोके यांनी केले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading