ठामपा आणि शेल्टर संस्थेच्या वतीने लोकमान्यनगर वस्तीमध्ये मासिक पाळी दिन साजरा

 संपूर्ण जगामध्ये 28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी दिन म्हणून साजरा केला जातो.  या दिनाच्या निमित्ताने ठाणे  महानगर पालिका,  शेल्टर असोसिएट्स आणि म्यूज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दिनांक 28 मे 2023 रोजी लोकमान्य नगर येथील राजे शिवाजी शाळा येथे जागतिक मासिक पाळी दिनाचे औचित्य साधून मासिक पाळी संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन दूर व्हावेत यासाठी विविध जाणीव जागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या उपक्रमात मासिक पाळी संदर्भात गाणी, व्याख्याने, प्रश्नोत्तरे,खेळ आणि तज्ञांचे वस्ती मधील रहिवाशांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे मॅडम यांनी मासिक पाळी संदर्भात समाजात पाळल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा गैरसमज यांच्या विषयी मार्गदर्शन करून या शरीर धर्माचा वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितला. त्याचसोबत मासिक पाळी संदर्भात उपस्थित महिलांवर पुरुषांमध्ये प्रश्न उत्तराद्वारे त्यांच्या मनात असलेले समज गैरसमज दूर करण्यात आले. या कार्यक्रमात शेल्टर संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापिका धनश्री गुरु यांनी संस्था करत असलेल्या मासिक पाळी स्वच्छता प्रकल्पावर ही मार्गदर्शन करीत ठाण्यामध्ये विविध वस्त्यांमध्ये जवळजवळ 2000 महिलांनी मेंस्ट्रुअल कप वापरण्यास सुरुवात केलेली आहे याचा परिणाम असा की सॅनिटरी नॅपकिन मुळे होणारा कचरा आपोआप कमी झाला व कप वापरामुळे लोकांचे आरोग्य चांगले राहण्यास तसेच पैशाची बचत होण्यास मदत होत आहे. मासिक पाळी याबद्दल लपून छपून चर्चा करून चुकीचा अर्थ मनात ठेवण्यापेक्षा उघडपणे त्यावर बोलून योग्य ती काळजी घेणे गरजेचं आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading