यूपीएसएसी स्पर्धा परीक्षेदिवशी सी.डी. देशमुख प्रशासकीय संस्थेने राबविले ‘जनजागृती महाअभियान’

  केंद्रीय लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा नुकतीच (28 मे 2023) ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील विविध परीक्षाकेंद्रावर पार पाडली. या परीक्षेदरम्यान यूपीएससी अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जगजागृती व्हावी यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या  चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेच्या वतीने रविवार दि. २८ मे २०२३ रोजी ठाणे व नवीमुंबई येथील 12 परीक्षा केंद्राबाहेर तर मुंबईतील 4 परीक्षा केंद्राबाहेर ऐतिहासिक असे “जगजागृती महाअभियान”राबविले.  या महाअभियानाच्या माध्यमातून सी.डी देशमुख संस्थेने एकूण २७४९ यूपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला असून, या महाअभियानास ठाणे, मुंबई, नवी  मुंबईतील विद्यार्थी व पालक यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून यूपीएससी स्पर्धा परीक्षेबाबत राबविलेल्या महाअभियानाचे ठाणे महानगरपलिकेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ठाणे महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेल्या निर्देशान्वये, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, उप आयुक्त अनघा कदम व संचालक महादेव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष “जनजागृती महाअभियान” राबविण्यात आले, ज्या अंतर्गत ठाणे व नवी मुंबई येथील एकूण १२ परीक्षा केंद्राबाहेर संस्थेची माहिती देणेकरिता संस्थेचे प्रतिनिधी तसेच ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. तसेच मुंबई येथे ४ परीक्षा केंद्राबाहेर संस्थेचे बॅनर लावण्यात आले होते.  सदर “जनजागृती अभियाना”द्वारे एकूण २७४९ UPSC विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधला असून, त्यांना संस्थेची संक्षिप्त माहिती दिलेली आहे. त्या अनुषंगाने एकूण ४३० नवीन विद्यार्थ्यांनी संस्थेच्या पूर्वपरीक्षा 2023 करीता नाव नोंदणी केलेली आहे.

प्रत्येक परीक्षा केंद्रात अंदाजे ४५० ते ६०० विद्यार्थी परीक्षा देण्याकरीता आले होते, त्यांच्या पालकांशी व विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात आला, व ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची, संस्थेच्या प्रवेश परीक्षा (चाचणी परीक्षा) २०२३ बाबत माहिती  तसेच माहितीपत्रकाचे वाटप करणे, केंद्रीय लोकसेवा आयोग मुख्य परीक्षेकरीता संस्थेच्या मार्गदर्शन वर्ग व सराव परीक्षा, व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण वर्ग, संस्थेचे पुढील नियोजित कार्यक्रम आणि यशस्वी वाटचालीबाबत माहिती देण्यात आली. अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी सदर “जगजागृती अभियानाचे” कौतुक केले आहे.

महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था येथे प्रशिक्षण घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये महाराष्ट्राचा मान बिंदू वाढवावा, असे आवाहन संस्थेचे संचालक श्री महादेव जगताप यांच्या तर्फे करण्यात आले. तसेच दि. २८/०६/२०२३ पासून Mains Batch मार्गदर्शन वर्ग आणि सराव परीक्षा सुरू होणार असून UPSC परीक्षा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या सराव परीक्षेला बसावे आणि अधिक माहितीकरीता संस्थेच्या केंद्रास भेट देण्यात यावी, असे आवाहन संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी  केलेले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading