ठाण्यावर सकाळी दाट धुक्याची छाया

ठाण्यामध्ये आज सर्वत्र धुक्याची दुलई पांघरल्याचं चित्र दिसत होतं. दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणातील गारवा चांगलाच वाढला असून त्याचा परिणाम म्हणून आज सकाळी सर्वत्र धुकंच धुकं दिसत होतं. सकाळी ७ नंतर दाट धुकं झाल्याचं दिसत होतं. हे धुकं इतकं दाट होतं की समोरच ५०० मीटरवर असलेली इमारतही दिसत नव्हती. अवकाळी पावसामुळे तापमान चांगलंच घटलं असून पारा १० अंशानं घटला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading