अय्यप्पा भक्तसंगम मंडलाच्या पूजेचं आयोजन

हिल गार्डनच्या अय्यप्पा भक्तसंगम मंडलाच्या पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदाचं हे २६वं वर्ष आहे. सध्या कोरोनामुळे सर्वत्र निर्बंध असल्यामुळे अतिशय छोट्या स्वरूपात पूजा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अन्यथा दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात आणि शेवटी मिरवणुकीनं कार्यक्रमाची सांगता होते. या पूजेसाठी खास केरळहून मंडळी येत असतात. दरवर्षी १४ नोव्हेंबरला शबरीमला येथे होली मंडला पूजेचं आयोजन केलं जातं. ४१ दिवस चालणा-या या पूजेची सुरूवात दरवर्षी १४ नोव्हेंबरला होते. या पूजेचा एक भाग म्हणून दरवर्षी डिसेंबर महिन्यातील पहिल्या शनिवारी ठाण्यात पूजेचं आयोजन केलं जातं. गेल्यावर्षीही कोरोनामुळे या पूजेवरती निर्बंध होते. यावर्षी अतिशय मर्यादित स्वरूपात पूजा करण्यात आली. कोरोनाची तिसरी लाट येऊ नये अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading